Ad will apear here
Next
कॅटलिस्ट फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत
पुणे : ‘पुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कॅटलिस्ट फाउंडेशन वस्तू रुपात मदत गोळा करून देणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे.

‘संपूर्ण पुणे शहरातून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करून ती पूरग्रस्त नागरिकांना देण्यात येणार आहे. जंतुनाशके, डेटॉल, फिनेल, पॅक केलेले धान्य, डाळी, तेल यांसारखे किराणामालाचे साहित्य याशिवाय कोरडे खाद्यपदार्थ(बिस्किटे, चिवडा,मॅगी), टूथब्रश, टूथपेस्ट, मेणबत्ती,  काडेपेटी, टॉर्च,  दप्तरे,  स्टेशनरी,  वह्या, पुस्तके,  पेन, शूज,  चप्पल, ब्लँकेटस्,  सतरंजी, चटई, चादर, बेडशीटस्, महिलांसाठी साडी, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन्स, पुरुषांसाठी टी-शर्ट्स, बम्युर्डा, स्वेटर आणि लहान मुलांचे कपडे, कानटोपी, पाण्याच्या बाटल्या, पत्रावळ्या, प्रथमोपचार साहित्य अशा स्वरुपात मदत द्यावी,’ असे आवाहन माने यांनी केले आहे. 

या ठिकाणी देऊ शकता आपली मदत :  

शिवाजीनगर :  नगरसेवक आदित्य माळवे यांचे शकुंतला नगर निकम उद्यानाजवळील कार्यालय.
संपर्क : ९८२२४ १५१४१, ९८६०५ ८६०७८, ८८०५० ३१२४६  

औंध : नगरसेवक प्रकाश उर्फ बंडू ढोरे यांचे कार्यालय 
संपर्क : ९८२२८ ९०२३७

बाणेर-बालेवाडी : नगरसेवक अमोल बालवडकर यांचे बालेवाडीमधील दसरा चौक येथील कार्यालय 
संपर्क : ९०१८७ ९०९९९, ८३८०० ८८६८६,

शुक्रवार पेठ : नगरसेवक अजय खेडेकर यांचे घोरपडे पेठ खडकमाळ आळी येथील कार्यालय, 
संपर्क :  ७४८८५ ७५७५७, ८९५७५ ७५७५७,  

कोरेगाव पार्क-घोरपडी : नगरसेवक उमेश गायकवाड यांचे मुंढवा येथील मराठी शाळेजवळील, तसेच कोरेगाव पार्क लेन नंबर सहा येथील विद्युत नगर हौसिंग सोसायटी मधील कार्यालय 
संपर्क : मुंढवा -९८२२७ ०११३३, कोरेगाव पार्क – ९९२२१ १५००२

कोथरूड : नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे बँक ऑफ महाराष्ट्रशेजारील उजवी भुसारी कॉलनीतील कार्यालय, 
संपर्क : ७७७५८ ७७७५२, ९७६७९ ६४३३४

कॅम्प परिसर : दिलीप गिरमकर यांचे हिंद तरुण मंडळ येथील कार्यालय 
संपर्क : ७७७०० ०७७७९  

सदाशिव पेठ :  राघवेंद्र मानकर यांचे निंबाळकर तालमीजवळील कार्यालय 
संपर्क : ८३८१० ७९०७९, ९९६०२ २२००९   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZWFCD
Similar Posts
‘पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील’ सांगली : ‘सैन्याला केवळ विजयच ठाऊक असतो. पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील. शुक्रवारी दिवसभरात पाच हजार लोकांना अवघड ठिकाणांहून बाहेर काढण्यात आले आहे,’ अशी माहिती जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार यांनी दिली.
पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मदत जमा करण्याचे आवाहन पुणे : ‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा येथे करावी,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले.
कोल्हापुरात पूरग्रस्त मदत नियंत्रण कक्ष स्थापन कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या कक्षाकडे पूरग्रस्तांसाठी मदत करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी ससूनचे ४२ डॉक्टरांचे पथक रवाना पुणे : कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक औषधे व उपचार साहित्य घेऊन बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील ४२ डॉक्टरांचे पथक रवाना झाले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language